Indian Football Schedule 2024-25 : अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या नुसार, 2024-25 भारतीय फुटबॉल हंगामाची सुरुवात 26 जुलै रोजी ड्युरंड कपने होईल, तर इंडियन सुपर लीग (ISL) सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. साल 1888 मध्ये सुरू झालेली ड्युरंड कप ही भारत आणि आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. यासोबतच ही जगातील तिसरी सर्वात जुनी स्पर्धा आहे.
त्याच वेळी, भारताच्या सर्वोच्च स्तरावरील फुटबॉल लीग ISL चा हा 11वा हंगाम असेल. दरम्यान, आय-लीग इंडियन वुमन्स लीग (IWL) आणि कलिंगा सुपर कप ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. आगामी हंगामातील आयडब्ल्यूएल(IWL) विंडो चार ऐवजी सहा महिने इतकी करण्यात आली आहे.
भारताची प्रमुख पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. याशिवाय, तळागाळात खेळाचा विकास करण्याच्या उद्देशाने, तीन वयोगटांतर्गत आयोजित एआयएफएफ(AIFF) युथ लीगचे आयोजन सप्टेंबरपासून पुढील नऊ महिने केले जाणार आहे. याशिवाय, भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघ मार्च आणि जून महिन्यात फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरी खेळेल.
अर्शीन कुलकर्णी उर्फ ‘ज्यु. हार्दिक पंड्या’ : क्रिकेटमधील एक उगवता तारा…
भारतीय फुटबॉल वेळापत्रक 2024-25
(1) ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप टियर 1 आणि टियर 2 : 15 जुलै ते 31 जुलै
(2) ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप टियर 1 आणि टियर 2 : 15 जुलै ते 31 जुलै
(3) ड्युरंड कप : 26 जुलै ते 31 ऑगस्ट
(4) आय लीग-3 : 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर
(5 )सब-ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप टियर 1 आणि टियर 2 : 5 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
(6) सब-ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप टियर 1 आणि टियर 2 : 5 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट
(7) AIFF युवा लीग (U-13/U-15/U-17) : 1 सप्टेंबर ते 31 मे
(8) 29 वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप ग्रुप स्टेज : 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर
(9) इंडियन सुपर लीग : 14 सप्टेंबर ते 30 एप्रिल
(10) सुपर कप : 1 ऑक्टोबर-15 मे
(11) 29 वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम फेरी : 1 ऑक्टोबर-15 ऑक्टोबर
(12) आय-लीग : 19 ऑक्टोबर-30 एप्रिल
(13) इंडियन वुमेन्स लीग (IWL) : 25 ऑक्टोबर ते 30 एप्रिल
(14) संतोष करंडक(ट्राफी) ग्रुप स्टेजसाठी 78 वी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा : 5 नोव्हेंबर ते15 नोव्हेंबर
(15) संतोष करंडक(ट्राफी) अंतिम फेरीसाठी 78वी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा : 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर
(16) इंडियन वुमेन्स लीग-2 (IWL 2) : 25 जानेवारी 2025 ते एप्रिल 30, 2025
(17) आय-लीग 2 : 15 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025
(18) नॅशनल बीच सॉकर चॅम्पियनशिप : 1 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025
(19) AIFF पुरुष फुटसल क्लब चॅम्पियनशिप : 1 मे 2025 ते 20 मे 2025