Sri Lanka cricket | श्रीलंकेच्या थिसारा परेराचे ‘सहा चेंडूत सहा षटकार’

कोलंबो – श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने श्रीलंका आर्मी स्पोर्टस क्‍लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट ऍथलेटिक क्‍लब यांच्यातील सामन्यात एकाच षटकात 6 षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

श्रीलंका आर्मी स्पोर्टस क्‍लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट ऍथलेटिक क्‍लब यांच्यात हा सामना झाला. 50 षटकांचा हा सामना पावसामुळे 41 षटकांचा खेळला गेला. श्रीलंका आर्मी स्पोर्टस क्‍लबची धावसंख्या 3 बाद 282 अशी असताना परेराने दिलहन कुरेच्या एकाच षटकात सहा षटकार फटकावले. आर्मी स्पोर्टस क्‍लबने 41 षटकांत 3 बाद 318 धावा केल्या.

ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि ऍथलेटिक्‍स क्‍लबचा पराभव निश्‍चित दिसत होता. त्यांची धावसंख्या 17 षटकांत 6 बाद 73 अशी होती. मात्र, पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

एका षटकात 6 षटकार फटकावणारा थिसारा परेरा नववा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळाडू ठरला. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्स, भारताचा युवराजसिंग व वेस्ट इंडीजचा पोलार्ड यांनी अशी कामगिरी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.