कोलोंबो – एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांना जलसमाधी मिळाली. श्रीलंकेच्या पूर्वेकडे कुरुनाकेन्नी गावाजवळ ही दुर्घटना घडली. श्रीलंकेच्या नौदलाने ही माहिती दिली. या दुर्घटनेच्यावेळी अन्य 17 जणांनी पोहत किनारा गाठला आणि आपला जीव वाचवला. वाचलेल्यांमध्ये आणखीन 3 विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी या बोटीतून प्रवास करत होते.
बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदलाने शोधमोहिम सुरू केली आहे. रॅपिड ऍक्शन बोट स्कॉर्डन. स्पेशल बोट स्कॉर्डन, पाणबुडे आणि शोधपथकातील तज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा अपघात झाला तेंव्हा बोटीमध्ये किमान 20 प्रवासी होते. ही बोट कुरिंचाकेनी पासून कुरुनाकेन्नी येथे निघाली होती. या भागातील पूलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे नागरिकांना बोटीतून नदी ओलांडावी लागते आहे.