मुंबई – श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूर यांना विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या किल्ले शिवनेरीला श्री शिवनेरीगड आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या पुरंदरचे श्री पुरंदरगड असे नामकरण करावे अशी मागणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प.माणिक महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघ शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प.माणिक महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघ शिष्टमंडळाने नुकतीच वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे भुषण असलेले वीणा, पगडी,चिपळ्या,उपरणे, हार घालून त्यांनी केलेल्या या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला. pic.twitter.com/ssgSjIOmVk— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 12, 2022
स्वराज्य संघ शिष्टमंडळाने नुकतीच वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेत याबाबत मागण्या केल्या. याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे भुषण असलेले वीणा, पगडी, चिपळ्या,उपरणे, हार घालून स्वराज्य संघ शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला व त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी विनम्रपणे स्वीकार केला.