Mark Zuckerberg followers decreased – फेसबुकचे अनेक वापरकर्ते सध्या अज्ञात कारणांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले बहुसंख्य फॉलोअर्स गमावल्याची तक्रार करत आहेत.यात खुद्द फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचेही तब्बल 119 दशलक्ष फॉलोअर्स कमी झाले आहेत. झुकरबर्गचे 119 दशलक्ष फॉलोअर्स कमी झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्या आता 10,000 च्या खाली गेली आहे.
तस्लिम नसरीन यांचेही फॉलोअर्स कमी झाले आहेत. नसरीन यांनी यांच्या आपल्या ट्विटर अकौंटवर ही माहिती देताना म्हटले आहे की, फेसबुकने सध्या त्सुनामी निर्माण केली आहे, ज्यात माझे जवळपास 900,000 फॉलोअर्स नष्ट केले आहेत आता आपले फक्त 9000 फॉलोअर्स उरले आहेत. मला फेसबुकची ही कॉमेडी आवडली.या विषयी संपर्क साधला असता, मेटा प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की काही लोक त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर सध्या काहीं विचित्र घडामोडींचा सामना करीत आहेत.
अनेकांच्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली आहे. मात्र त्याचे नेमके कारण स्पष्ट होताना दिसत नाही. शक्य तितक्या लवकर आम्ही या प्रकाराचे नेमके कारण शोधून काढू, या प्रकाराबद्दल त्यांनी आपल्या खातेधारकांची दिलगीरी व्यक्त केली आहे. Mark Zuckerberg followers decreased