मुंबई – सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरदेखील पुन्हा एकदा जखमी झाला आहे. त्याच्या हाताला दुखापत झाली असून त्यामुळे त्याला आता गोलंदाजी करणेही शक्य नसल्याची माहिती हैदराबाद संघाचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी दिली आहे.
नव्याने दुखापत झाल्यामुळे आगामी सामन्यांत तो खेळू शकणार का नाही हे त्याच्या हाताचे स्कॅनिंग झाल्यावरच समजेल असेही सांगण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वीही दुखापत झाल्यामुळे तो सुरुवातीचे तीन सामने खेळू शकला नव्हता. त्यानंतर गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात त्याने या मोसमातील पहिला सामना खेळला होता. मात्र, रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला जखम झाली.
सुरुवातीला सलग पाच विजय नोंदवल्यानंतर हैदराबदचा चेन्नई आणि गुजरात टायटन्सकडून पराभव झाला. हैदराबादची पुढील लढत येत्या गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार असून त्या सामन्यापूर्वी सुंदर पूर्ण तंदुरुस्त होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.