मुंबई – अमिरातीत येत्या 19 सप्टेंबरपासून यंदाच्या मोसमातील आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी सध्या सहभागी संघांनी आपाल्या संघात कोणते खेळाडू असावेत यासाठी लिलावात बोली लावल्या गेल्या.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय मालिकांमुळे भारतासह परदेशी संघाच्याही खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. त्यातच रॉयल चॅलेंजर बेंगळूरू संघाच्या वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यामुळे चांगलाच फटका बसला आहे.
त्याला इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला आता आयपीएलमध्येही सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी बेंगळुरू संघाने बंगालचा वेगवान गोलंदाज अक्षदीपला संधी देण्याचा निर्णय जाहीर केला.