ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनने हातपाय पसरले! बाधितांची संख्या ३३६ वर; प्रशासनाने उचलली सतर्कतेची पाऊले

लंडन : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन  हातपाय पसरताना दिसत आहे. याबाबत ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी ओमायक्रॉनचे संक्रमण वाढल्याची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी संसदेतयाविषयी माहिती दिली आहे. ओमायक्रॉन या करोना व्हेरियंटचे नवीन स्वरूप देशातील अनेक भागात वेगाने पसरू लागले आहे.

जावेद यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ म्हणजेच ब्रिटनच्या संसदेमध्ये सांगितले की, ”ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत या प्रकारच्या व्हेरियंटची एकूण 336 रुग्ण आढळून आले आहेत.” ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी पुढे सांगितले की, ”ब्रिटनमधील ओमायक्रॉनचे नवे 71 रुग्ण स्कॉटलंडमध्ये सापडले असून वेल्समध्येही 4 बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाशी काहीही संबंध नाही. या वाढलेल्या आकडेवारीवरुन ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाल्याचा आढळले आहे.”

ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने सतर्कतेची पाऊले उचलली आहेत. नवे रुग्ण आढळलेल्या भागात आणि आसपासच्या ठिकाणी जास्त चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. ब्रिटनच्या पूर्व, लंडन, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम आणि पूर्व आणि पश्चिम मिडलँड्समध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत.

ब्रिटनच्या वेल्समध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. वेल्स सरकारने सांगितले की, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सुरुवातीला कार्डिफ आणि वेले युनिव्हर्सिटी हेल्थ बोर्ड परिसरात सापडले होते. या बाधितांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. दरम्यान, शुक्रवारी स्कॉटलंडमध्ये आणखी 16 रुग्ण आढळून आले. त्यानंतर देशातील एकूण 29 लोक या नवीन प्रकाराचे बळी ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.