NZ vs IND – शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामान्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात ५० षटकांत ७ गडी गमावून ३०७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने टॉम लॅथम आणि कर्णधार विल्यमसन यांच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर ७ गडी राखून सामना जिंकला. दरम्यान, पहिल्या डावात भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा सुरु आहे.
विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!
शुक्रवारी झालेल्या ( NZ vs IND ) सामन्यात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, मात्र या सामन्यात सूर्या अवघ्या ४ धावा करून बाद झाला. महत्वाचं म्हणजे सूर्यकुमार यादव अपयशी ठरला, मात्र संघाचा अष्टपैलू खेळाडू सुंदरने एकदम सूर्याच्या खेळण्याच्या अंदाजात फटकेबाजी केली. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. यावेळी त्याने न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीच्या एका चेंडूवर लगावलेला फटका आता चांगलाच चर्चेत आलाय. सुंदरच्या याच खेळीमुळे भारतीय संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
विराट कोहलीने मुंबईत एक अपार्टमेंट भाड्याने घेतले, महिन्याचं भाडं ऐकून दाताखाली बोटं चावालं!
सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा मॅट हेन्री ४९वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी सुंदरने मॅट हेन्रीच्या लो फुल टॉस चेंडूवर शॉर्ट-फाईनवर असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चौकार मारला. त्याच्या याच शॉटची सूर्यकुमारशी तुलना केली असून याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मॅट हेन्रीच्या याच ४९व्या षटकात सुंदरने १७ धावा केल्या.
can you blame us for making the obvious ‘𝐀𝐭𝐢 𝐒𝐮𝐧𝐝𝐚𝐫’ pun for this Washi batting video? 😅
Watch the 1st #NZvIND ODI, LIVE & EXCLUSIVE on Prime Video: https://t.co/3btfvTeRUG@Sundarwashi5 #NZvINDonPrime #CricketOnPrime pic.twitter.com/pBVvRBAmZP
— prime video IN (@PrimeVideoIN) November 25, 2022
भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली होती. यानंतर गिल (५० धावा) तर धवन (७२ धावा) करून लागोपाठ बाद झाले. श्रेयस अय्यरने सावध फलंदाजी करत संघाची धावसंख्या सुरूच ठेवली. मात्र, दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत ( १५ धावा) आणि सूर्यकुमार यादव (४ धावा) करून बाद झाले. संजू सॅमसनने ३६ धावांचे योगदान दिले. अय्यर शतकापासून चुकला आणि ८० धावांवर टीम साऊदीचा बळी ठरला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने फिनिशरची भूमिका घेत भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.