टोकियो – मानवी शरीरातील आतड्यामध्ये असलेला एक खास प्रकारचा विषाणू माणसाला दीर्घायुष्य देऊ शकतो. या विषाणूमुळे विविध रोगांच्या संसर्गाचे प्रमाण कमी होते आणि माणूस शतायुषी होऊ शकतो असा दावा जपानमधील संशोधकांनी केला आहे.
टोकियोमधील कीयो युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन मधील संशोधकांनी शंभर वर्षापेक्षा जास्त जगलेल्या अनेक लोकांचे संशोधन करून हा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे. मानवी आतड्यमध्ये आढळणाऱ्या या विषाणूला गट बॅक्टेरिया किंवा गट मायक्रोबियल असे म्हटले जाते आतडी व्यवस्थित ठेवणे आणि अनेक संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्याचे काम हा विषाणू करतो. त्यामुळे माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते असा दावा या संशोधकांनी केला आहे.
आतड्यांमधील या खास विषाणूंची संख्या जेव्हा कमी होते तेव्हा इतर घातक विषाणूंची संख्या वाढते आणि पोटासंबंधी किंवा आतड्यासंबंधी रोग उदभवू शकतात. या प्रयोगात सरासरी 107 वय असणाऱ्या 160 नागरिकांवर संशोधन करण्यात आले.
25 ते 45 वयोगटातील काही लोक आणि ऐंशी ते शंभर वर्ष वयोगटातील आणखीन काही लोक यांच्या आतड्यातील विषाणू आणि या 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या 160 लोकांच्या आतड्यातील विषाणू यांची तुलना केली असता हा निष्कर्ष समोर आला हा विषाणू अतिशय गंभीर स्वरूपाचे आजारही परतून लावू शकतो असा दावाही या संशोधकांनी केला आहे.