Taiwan Earthquake । तैवानची राजधानी तैपेईमध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी मोजली गेली, जी धोकादायक श्रेणीत मोडते. तैवानमध्ये 25 वर्षांतील हा सर्वात भीषण भूकंप आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपानने सतर्कतेच आणि त्सुनामीचा इशारा दिला.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणतीही जीवित हानी झाल्याची बातमी अद्याप समोर आली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. व्होल्कॅनो डिस्कवरीच्या अहवालानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 35 किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा धक्का जाणवला. भूकंपाची खोली जास्त असल्याने त्याचे केंद्रस्थानी जोरदार धक्के जाणवले.
BREAKING: Massive shaking on flyover/road amid massive earthquake in Taiwan pic.twitter.com/3k7fOtHt0k
— Insider Paper (@TheInsiderPaper) April 3, 2024
तैवाननेही त्सुनामीचा इशारा दिला Taiwan Earthquake ।
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन शहराच्या दक्षिणेला सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननेही भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिलाय. CWA ने रहिवाशांना त्सुनामीचा इशारा पाठवला आहे. उत्तरेकडील किनारपट्टी भागात त्सुनामी येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
जपानमध्ये 10 फूट उंच त्सुनामीचा इशारा Taiwan Earthquake ।
त्याचवेळी, तैवानचा शेजारी देश जपाननेही भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिलाय. जपानच्या मेट्रोलॉजिकल एजन्सीने त्सुनामीच्या लाटा 3 मीटर (10 फूट) उंचीपर्यंत येण्याचा इशारा दिला आहे. जोरदार भूकंपानंतर जपानला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्सुनामीचा इशारा जारी केल्यामुळे, लोकांना ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले.
तैवानमधील भूकंप ‘रिंग ऑफ फायर’मधून आला
तैवान पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ जवळ स्थित आहे. या भागात नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात. ‘रिंग ऑफ फायर’ प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुरू होते अन् दक्षिण अमेरिकेतील चिली या देशापर्यंत पसरते. त्यामुळे इंडोनेशियापासून चिलीपर्यंत नेहमीच भूकंपाचे तीव्र धक्के जाणवत आहेत.
फिलिपाइन्समध्येही त्सुनामीचा इशारा
त्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन फिलिपाइन्सने सतर्कतेचा इशारा दिला आहे. फिलिपाइन्सच्या भूकंपविज्ञान संस्थेने अनेक प्रांतांच्या किनारी भागासाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे आणि येथे राहणाऱ्या लोकांना उंच भागात जाण्यास सांगितले आहे.