टोकियो – जपानमधील खासगी कैरोज या रॉकेटचे प्रक्षेपण अयशस्वी झाले आहे. बुधवारी हे रॉकेट अवकाशात सोडण्यासाठी प्रक्षेपण झाले. त्यानंतर काही सेकंदातच या रॉकेटचा स्फोट झाला आणि ते नष्ट झाले. जपानच्या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
या रॉकेटचे थेट प्रक्षेपण टिव्हीवर केले गेले होते. या रॉकेटचे अवशेष जवळपासच्या डोंगरांमध्ये आणि समुद्रामध्ये कोसळले. या रॉकेटच्या स्फोटामुळे प्रक्षेपणाच्या ठिकाणी मोठी आग देखील लागली होती. ही आग विझवण्यासाठी काही तास लागले.
क्योतो या शहरातील स्पेस-वन या खासगी कंपनीने उपग्गह अवकाशात सोडण्यासाठी हे रॉकेट विसकित केले होते. या अयशस्वी झालेल्या प्रक्षेपणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
प्रक्षेपणादरम्यान घ्यायची सर्व खबरदारी आणि संभाव्य दुग्घटना टाळण्यासाठी घ्यायची काळजी घेतली गेली होती, असे स्पष्टिकरण कंपनीच्यावतीने दिले आहे.
प्रारंभी शनिवारी प्रक्षेपण नियोजित होते. परंतु कंपनीला सुरक्षेसाठी रिकामे असण्याची गरज म्हणून निश्चित केलेल्या समुद्राच्या एका भागात एक जहाज असल्याचे आढळून आल्यामुळे विलंब झाला होता.
या रॉकेटच्या माध्यमातून सोडण्यात येणारा उपग्रह उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्याचे सरकारी उपग्रहाचे काम पुढे सुरू ठेवणार होता.
स्पेस-वनची पार्श्वभुमी
किफायतशीर खर्चामध्ये अंतराळ सुविधा देण्यासाठी स्पेस-वन ही कंपनी २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. जपान सरकारच्या मालकीच्या डेव्हलपमेंट बँक ऑफ जपान आणि कॅनॉन इलेक्ट्रॉनिक्स,
आयएचआय एरोस्पेस आणि शिमिन्झो कॉर्पोरेशनने मिळून ही कंपनी सुरू केली आहे. या कंपनीच्या रॉकेटचे पहिले प्रक्षेपण २०२१ मध्ये होणार होते. मात्र विविध कारणांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलले गेले होते.