मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
चित्रपटांचे शूटिंग जुलै महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. जुलै महिन्यात शूटिंगला जरी परवानगी मिळाली तर शूटिंगच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, आता नवीन मार्गदर्शक तत्वानुसार टीव्ही सिरीयलचे शुटींग सुरु होणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे शुटींग गेले जवळ जवळ दीड महिना बंद आहे. मात्र आता नवीन एपिसोडचे शुटींग सुरु होत असल्याचे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयचे अध्यक्ष बी. एन तिवारी यांनी एका प्रसिद्ध वृत्ताला सांगितले आहे.
यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत ती पाळून शुटींग सुरु केले जाणार आहे. त्यात एकता कपूरच्या भाभीजी घर पर है, सोनीच्या रियालिटी शो आणि केबीसीच्या शुटींग चा समावेश आहे. यासाठी दैनिक कर्मचारी आणि निर्माते यांना काही अटी पाळाव्या लागणार आहेत.
आता करोना सह जगणे आवश्यक बनल्याने आणि करोनाची लस लवकर येण्याची शक्यता नसल्याने सर्वाना मास्क वापरणे, सॅनीटायझर वापरणे बंधनकारक असून त्याची नीट अंमलबजावणी होते वा नाही हे पाहण्यासाठी एक सुपरवायझर नेमावा लागणार आहे.