नारायणगाव-जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगदंब प्रतिष्ठान, ग्रामपंचायत नारायणगाव व पोलीस स्टेशन यांच्यातर्फे ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांना पीपीई किट, एन 95 मास्क, सॅनिटायझर, सर्जिकल मास्क वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आशिष हांडे, सरपंच योगेश पाटे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे, वारुळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे, संजय वारुळे, जंगल कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, डॉ. बोळींज, डॉ. मिलींद घोरपडे, आरोग्य केंद्राच्या डॉ. वर्षा गुंजाळ, तेजस झोडगे, तुषार डोके, अतुल आहेर, अजित वाजगे, अनिल खैरे आदी उपस्थित होते.