सोमेश्वरनगर -वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या करंजेपूल दूर क्षेत्रातील पोलिसांनी सोमेश्वरनगर येथे रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत 4 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आणि करंजेपूल ग्रामपंचायत यांच्या वतीने मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई दरम्यान करंजेपूल दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार महिंद्र फणसे, नाईक सिताफ लोकरे, गृहरक्षक दल तुषार साळुंके, ओंकार सौरभ पटेल तसेच करंजेपूलचे सरपंच वैभव गायकवाड, ग्रामसेवक आबासाहेब यादव, कर्मचारी श्रीकांत शेंडकर, योगेश गायकवाड, सूर्यकांत गायकवाड यावेळी उपस्थित होते.