सोलापूर – ऐन दिवाळीत उत्साही वातावरण असताना एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. मृत राहुल शिरसाट सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ही घटना केशवनगर पोलीस लाईन परिसरात घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती कळतात वरिष्ठ अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत राहुल शिरसाट यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. शिरसाट यांनी इतकंच टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.