India Vs New Zealand World Cup 1st Semi Final 2023 Live Cricket Score: विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया उतरेल.
IND vs NZ Live Score: कोहलीनं मोडला सचिनचा शतकाचा विक्रम..
विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला.हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे. अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने 49 वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली होती. त्याचबरोबर कोहलीने 279व्या डावात 50 शतके झळकावली आहेत.
कोहली ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज…
विराट कोहलीने या विश्वचषकात 673 हून अधिक धावा केल्या आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम (673) सचिनच्या नावावर होता.कोहलीने आज हा विक्रम मोडला. यापूर्वी सचिन तेंडुलकरनं 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय.
एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा:
711 धावा – विराट कोहली (2023)
673 धावा – सचिन तेंडुलकर (2003)
659 धावा – मॅथ्यू हेडन (2007)
648 धावा – रोहित शर्मा (2019)
647 धावा – डेव्हिड वॉर्नर (2019)
विराट कोहलीचे दमदार अर्धशतक
त्याआधी,विराट कोहलीने 59 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे 72 वे अर्धतक ठरले. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या बाबतीत त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. भारताची धावसंख्या एका विकेटवर 200 धावा पार झाली आहे.विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत.
शुभमन गिल retired hurt
त्यापूर्वी,शुभमन गिल 65 चेंडूत 79 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मात्र, तो नाबाद आहे. मुंबईच्या उष्णतेमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याला परत जावे लागले. आता विकेट पडल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.
शुभमन गिलचे अर्धशतक..
त्याआधी शुभमन गिलने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 13 वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडिया चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
तत्पूर्वी,भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाा. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोङीनं आक्रमक सुरूवात केली. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 70 इतकी झाली होती.
त्यानंतर 8.2 षटकात भारताची पहिली विकेट 71 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. टीम साऊदीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करत असताना तो केन विल्यमसनच्या हाती झेलबाद झाला. हा झेल खूप अवघड होता, पण विल्यमसनने अप्रतिम झेल घेतला.
रोहितच्या नावे आणखी एक विक्रम…
दरम्यान, रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार ठोकले असून विश्वचषकात 51 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही तो खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 28 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही त्याने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.
दरम्यान, याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते तेव्हा भारताने विजय मिळवला होता. तथापि, न्यूझीलंड हा एकमेव संघ होता ज्याने साखळी टप्प्यात भारताला चांगलीच टक्कर दिली होती. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीचा सामनाही रोमांचक होण्याची शक्यता आहे.