Solapur Lok Sabha Election 2024 । सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले.
राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झालेत. सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जातायेत. ज्यात ‘चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया’ अशा पोस्टकरण्यात येतायेत. त्यामुळे सोलापुरच्या निवडणुकीत ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असा थेट प्रचाराचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, याला राम सातपुते समर्थक कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशात मविआ आणि महायुतीचे हे दोन्ही उमेदवार तरुण आहे.
या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी या दोन्ही नेत्यांमध्ये लेटरवॉर सुरू असतानाच जिल्ह्यात एका बेरोजगार तरुणाचं लेटर व्हायरल झालं आहे. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
Solapur Lok Sabha Election 2024 । नेमकं काय लिहिले आहे पत्रात
‘कु. प्रणितीताई यांचे पत्र पाहिले. अत्यंत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करून दिलं. त्याला प्रतिउत्तर देत रामभाऊंनीही अत्यंत गंभीर आणि खोचक तसेच शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसत आहे. दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला..! परंतु माझ्या सारख्या तरुणाला आजही या प्रश्नांची उकल झाली नाही, ती म्हणजे मला सोलापूर सोडून का जावं लागतं? मला शिक्षण तर मिळतंय पण नोकरी का नाही? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर येते, पण पाणी का नाही मिळत?, असा सवाल या तरुणाने पत्रातून केला आहे.
Solapur Lok Sabha Election 2024 । तरीही तुमचं स्वागत आणि अभिनंदन
तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात. उच्चशिक्षित आहात. तरीही माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावे लढावे लागते, तर कधी एकत्र यावे लागते. परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याच्या प्रयत्न केलाच नाही. रण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय. दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं.पण आमच्या सारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं.असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिंनदन..!, असंही त्या पत्रात म्हटलं आहे.
Solapur Lok Sabha Election 2024 । “तुम्ही केवळ पक्षाचे प्रतिनिधी”
तुम्हा दोघांतील एक जण राजकीय वारश्याने तर एकजण राजकीय वरदहस्ताने ह्या लोकसभेसाठी उभे आहात! परंतु कोणीही जनसामान्यातून उभे राहिलेले नाही. तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात. परंतु लोकांचे नाही…!, असं म्हणत दोन्ही युवा नेत्यांना या युवकाने पत्र लिहिलं आहे.
असो, कुणी ऊसतोड कामगाराचा दलिताचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता, मी एक नारी म्हणून मुंबईतील घरामध्ये परंपारिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढच आश्वासन गरजेचे आहे..!, असा संदेश या पत्रात लिहिण्यात आला आहे. या पत्राची सोलापुरात जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळतं आहे.’