Mukhtar Ansari । उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या माफिया डॉन मुख्तार अन्सारीची काल रात्री अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे मुख्तार अन्सारी यांना तातडीने बांदा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. पोलीस प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसीयू झोनचे छावणीत रूपांतर केले आहे. मुख्तार यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
मुख्तार अन्सारीच्या वकिलांनीही काही अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे. तुरुंग अधीक्षकांनी बांदा मेडिकल कॉलेजला पत्र लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय सुविधा देण्याबाबत बोलले होते. माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक रात्री कारागृहात पोहोचले. तिथे डॉक्टरांना अन्सारीची तब्येत बिघडल्याचे जाणवले. अशा स्थितीत त्यांना तुरुंगातून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. याठिकाणी त्यांना सध्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलंय.
स्लो पॉयझनची तक्रार Mukhtar Ansari ।
मुख्तार अन्सारी यांनी त्यांचे वकील रणधीर सिंग सुमन यांच्यामार्फत न्यायाधीशांना अर्ज लिहिला होता. यात “19 मार्च रोजी जे अन्नदान करण्यात आले होते,त्यात कुठलातरी विषारी पदार्थ होता. हे अन्न खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. हात-पायांच्या नसांमध्ये तीव्र वेदना होत असून हात-पाय थंड होऊ लागले आहेत. मृत्यू येईल असे वाटते.असे म्हटले गेले आहे. तर “माझ्यावर योग्य डॉक्टरांकडून उपचार करा,” असे त्यांनी सांगितले. 40 दिवसांपूर्वीही मला विषारी द्रव्य पाजले होते असा आरोप त्यांनी केलाय.
कारागृह प्रशासनाने आरोप फेटाळून लावले Mukhtar Ansari ।
बांदा जेलच्या अधीक्षकांनी माफिया मुख्तार अन्सारीला स्लो पॉयझन दिल्याचा आरोप फेटाळून लावला होता. प्रशासनाने सांगितले की, आधी हवालदार आणि नंतर डेप्युटी जेलर अन्न खातात. त्यानंतर मुख्तार अन्सारीपर्यंत ते अन्न पोहोचले जाते . कारागृहातील सुमारे 900 कैदीही हेच अन्न खातात. असे सर्व आरोप निराधार आहेत. सुरक्षेच्या व्यवस्थेबद्दल बोलायचे झाले तर सीसीटीव्हीसह सिव्हिल आणि पीएसीकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.