शिरूर- येथील चांदमल ताराचंद बोरा कॉलेजच्या 1992 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी शिरूर शहरासाठी सामाजिक बांधिलकीतून नगर परिषदेत कामगार, नागरिकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर मशीन दिले आहे.
याप्रसंगी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, नगरसेवक संजय देशमुख, सचिन धाडीवाल, नगरसेविका उज्वला बरमेचा, उज्ज्वला वारे, मुख्याधिकारी महेश रोकडे, राजेंद्र ढोबळे, प्रदीप करंजुले, विजय शिंदे, ताराचंद देसर्डा, बबलू थोरात, किरण बनकर, सोनाली सरोदे, पांडुरंग शिंदे उपस्थित होते. हे मशीन मुख्याधिकारी रोकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.