मुंबई – किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत. आता आम्ही दगडाची भाषा दगडाने करू. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गॅंगवार सुरू केले आहे. त्यामुळे आता तांडव होणार, असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.
बाळासाहेबांचे शिवसैनिक असे पोलिसांच्या मागे लपून हल्ले करीत नव्हते. फक्त 24 तास पोलिसांना दिलीप वळसे पाटील यांनी सुटी द्यावी. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू. दगडाची भाषा दगडाने करू. सरकारी पक्षाचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक रस्त्यावर पोलिसांच्या संरक्षणात धिंगाना करीत असतील तर, राज्याच्या जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडे दाद मागावी, असा संतप्त सवाल राणे यांनी केला.
काल मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक रस्त्यावर धिंगाणा घालत होता. अन्यवेळी तुम्ही मुंबईत सणासुदीला कलम 144 लावता. काल का नाही लावले हे कलम? मुंबईच्या आयुक्तांना माझे विचारणे आहे की, काल का तुम्ही जमावबंदी लावली नाही? लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी का घेऊ शकला नाही. तुम्हाला शिवसेनेच्या पे रोलवर ठेवले आहे का. तसे असेल तर सांगून टाका. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवणे बंद करू.अशी टीकाही नितेश राणे यांनी केली