मुंबई – इंधनाचे गगनाला भिडलेले दर, गाड्यांच्या वाढलेल्या किंमतीने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बाइक किंवा चार्जिंग बाइक हा पर्याय होता. आजही आहे. मात्र त्यात काही त्रुटी आढळून येत आहेत. सध्या उन्हाळा सुरु असल्याने वाहनांना आग लागण्याच्या घटनां वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे ओला कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे 1,441 युनिट्स परत मागवले आहेत.
ओला इलेक्ट्रिक कंपनीने याबाबत एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की 26 मार्च रोजी वाहनाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे आणि प्राथमिक मूल्यांकनात ही एक वेगळी घटना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्री-एम्प्टिव्ह उपाय म्हणून त्या विशिष्ट बॅचमधील स्कूटर्सचे तपशीलवार निदान आणि तपासणी करणार आहोत म्हणूनच 1,441 वाहने ऐच्छिक परत मागवत आहोत असं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांद्वारे तपासणी केली जाईल आणि सर्व बॅटरी सिस्टम्स, थर्मल सिस्टम्स तसेच सुरक्षा प्रणालींमध्ये सखोल निदान केले जाईल असंही कंपनीने म्हटलं आहे.