…म्हणून मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो – सयाजी शिंदे

मुंबई – मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’तील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली. “हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हला नको. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होतं.

दरम्यान, या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मराठी अभिनेता आणि वृक्षप्रेमी ‘सयाजी शिंदे’ यांनी देखील ठाकरेंचे अभिनंदन केले आहे.

“आरेमध्ये कारशेड व्हावं का नाही, मेट्रो व्हावी की नाही हा निर्णय सरकारचा आहे. पण कोणत्याही विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबत जो निर्णय घेतला त्याचं एक पर्यावरणप्रेमी म्हणून मी अभिनंदन करतो”, असं सयाजी शिंदे म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.