नवी दिल्ली – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. PM Fumio भाषण देत असताना त्याचवेळी स्मोक बॉम्ब हल्ला झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे.
द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार होते त्याआधीच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत असल्याचे या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडले.
岸田さんの演説でまさか目の前で… pic.twitter.com/RcXWnYbuzB
— ゆき (@yukiko_070) April 15, 2023
विधानसभेत झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते, असे सांगण्यात येत आहे.