नेहा कक्‍कडच्या एक्‍सबॉयफ्रेंडची शेरेबाजी

मुंबई – गायक हिमांश कोहली आणि गायिका नेहा कक्‍कड यांच्यातील प्रेमकहाणीचे किस्से लोकांना ऐकून पाठ झाले असतील. या दोघांचे ब्रेकअप 2018 साली झाले. त्यानंत नेहाने टिव्ही कार्यक्रमात सेटवर आणि सोशल मीडियावरही आपले दुःख व्यक्‍त केले होते.

तिच्या या भावनांवर अनेक सेलिब्रिटींनी तिला सहानुभूतीपूर्वक कॉमेंटही केली होती. मात्र हिमांश कोहलीने पहिल्यापासूनच या विषयावर न बोलण्याचे धोरण कायम ठेवले होते. मात्र आता एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने आपली भूमिका मांडली आहे.

ब्रेकअपनंतर आता कोणाशीही या विषयावर बोलण्याची मला आवश्‍यकता नाही. लोकांनी मला खूप नावे ठेवली. पण मी नेहाला नाव ठेवणार नाही. तिची बदनामी करणार नाही, असे तो म्हणाला. 2018 मध्ये जे झाले, ते झाले.

आता पुढचा प्रवास करावा लागणार आहे. पुढे आयुष्य जगायचे आहे. काही लोकांना अजूनही 2018 मध्येच रहावे असे वातते आहे. ते कधीच इतिहासातून बाहेर येऊ शकणार नाहीत.

मी जर कोणाशी वाईट वागलो असतो, तर मी स्वस्थपणे झोपू शकलो नसतो. या विषयासंदर्भात कोणालाही कोंणतेही स्पष्टीकरण देण्याची आपल्याला गरज नाही, असेही तो म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.