अहमदाबाद – लोकेश राहुलचे धुव्वाधार अर्धशतक आणि हरप्रीत ब्रारची भेदक गोलंदाजी यामुळे पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ३४ धावांची एकतर्फी विजय मिळवला.
Paise k liye nhi Turban nhi pehnte hum 🙏🏽 #isupportfarmers pic.twitter.com/lghpeG83wB
— Harpreet Brar (@thisisbrar) April 25, 2021
या विजयानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांद्वारे हरप्रीत चे कौतुक करण्यात आले. एका युजर्सने त्याची तुलना ‘सिंग इज ब्लींग’ या चित्रपटात काम करणार्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी केली.मात्र हरप्रीतला त्याची तुलना बॉलीवूडच्या खिलाडी सोबत केलेली आवडली नाही. त्या युजर्सने ट्विट केले होते की,’पाजी तु्म्ही सिंग इज ब्लींग चित्रपटातील अक्षय कुमारसारखे दिसता.’ यावर हरप्रीतने त्या युजर्सला रिप्लाय दिला आहे. सध्या त्याने दिलेल्या प्रत्युत्तराची सोशलवर चांगली चर्चा आहे.
हरप्रीतने रिट्विट केले आहे की,”आम्ही पैशासाठी पगडी घालत नाही.’या ट्विटमध्ये त्याने अक्षयला टोमणा मारला, तर पंजाबच्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत हॅशटॅगही पोस्ट केला.