Sri Lanka Squad Vs Afghanistan Odi Series :- अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 16 सदस्यीय संघात श्रीलंकेचा माजी कर्णधार दासून शनाकाला स्थान मिळालेले नाही. शनाकासोबतच फलंदाज नुवानिडू फर्नांडो आणि लेगस्पिनर जेफ्री वेंडरसे यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. अष्टपैलू चमिका करुणारत्ने आणि सलामीवीर शेवोन डॅनियल्स संघात सामील झाले आहेत.
50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये खराब कामगिरीमुळे शनाकाला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या शेवटच्या 21 डावांमध्ये त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले असून त्याची सरासरी 12.25 आहे. 2024 च्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत फर्नांडो आणि वेंडरसे संघाचा भाग होते. फर्नांडोला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती तर वेंडरसे मालिकेत फक्त 1 सामना खेळला. त्यामध्ये तो खूपच प्रभावी ठरला होता आणि त्याने 47 धावांत 2 बळी घेतले होते.
मजबूत होणार फलंदाजीची लाइन-अप…
उर्वरित संघात कुसल मेंडिस, पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समराविक्रामा, चारिथ असलंका आणि जेनिथ लियानागे यांचा समावेश आहे, ज्याने एक मजबूत बॅटीग लाइन-अप तयार झालेली दिसते. फिरकी विभागाचे नेतृत्व स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा आणि महेश तीक्ष्णा यांच्याकडे असेल. वेगवान गोलंदाजीच्या पथकात दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका आणि प्रमोद मदुशन या खेळाडूंचा समावेश आहे.
अर्शीन कुलकर्णी उर्फ ‘ज्यु. हार्दिक पंड्या’ : क्रिकेटमधील एक उगवता तारा…
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ : कुसल मेंडिस (कर्णधार ), चरिथ असलांका, पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, सहान अराचिगे, शेवोन डेनियल, जेनिथ लियानगे, चमिका करुणारत्ने, महेश तीक्ष्णा, दिलशान मदुशंका, दुष्मंथा चमीरा, डुनिथ वेललागे, प्रमोद मदुशन, अकिला धनंजय, वानिंदु हसरंगा.