काबूल – अफगाणिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. याशिवाय बल्ख आणि फर्याब प्रांतातही सुमारे दहा हजार गुरे मरण पावली आहेत. पशुमालकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विविध मंत्रालयांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीने बल्ख, जॉज्जान, बादघिस, फर्याब आणि हेरात प्रांतातील पशुपालकांना पाच कोटी अफगाणी चलन देण्याची घोषणा केली आहे. हिवाळी सेवा कर्मचाऱ्यांनी आधीच बाघिस, घोर, फराह, कंदहार, हेलमंड, जॉज्जान आणि नूरिस्तान यांसारख्या प्रांतांमध्ये अलीकडील हिमवर्षावामुळे बाधित झालेल्या लोकांपर्यंत मदत पुरवली आहे.
तीव्र हिमवृष्टीमुळे सालंग खिंडीसह प्रमुख वाहतूक मार्ग बंद झाले आहेत आणि घोर, बादघिस, गझनी, हेरात आणि बाम्यान यांसारख्या विविध प्रांतांमध्ये प्रवेश बंद झाला आहे, असे तालिबानी प्रवक्त्याने सांगितले आहे.