काबुल – अफगाणिस्तानात हत्येच्या प्रकरणात दोषी असलेल्या एका व्यक्तीला तालिबानने जाहीरपणे मृत्यूदंडाची शिक्षा दिलीआहे. सोमवारी स्टेडियमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत त्याला ही शिक्षा देण्यात आली.
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीकडून गेल्या पाच दिवसांत तीन जणांना अशाप्रकारे सार्वजकिरित्या मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
उत्तर जवजान प्रांताची राजधानी शिबिरघन शहरात प्रचंड बर्फवृष्टी सुरू असताना एका व्यक्तीला रायफलीतून पाच गोळ्या झाडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. आताही स्टेडीयमवर दिल्या गेलेल्या शिक्षेच्या वेळी सगळीकडे प्रचंड गर्दी होती. मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
२०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता बळकावल्यानंतर तालिबान राजवटीने जाहीरपणे मृत्यूदंड देण्याची ही पाचवी घटना आहे. आपली राजवट उदार स्वरूपाची असेल असा दावा त्यांच्याकडून अगोदर करण्यात आला होता.
मात्र नंतर त्यांनी पुन्हा मृत्यूदंडाचे असे जाहीर प्रदर्शन घडवण्याचे काम सुरू केले आहे. फाशी, चाबकाचे फटके मारणे, दगड मारणे अशा अघोरी पध्दतीने शिक्षा दिल्या जात आहेत.
१९९० च्या दशकातही अफगाणिस्तानात तालिबानची राजवट होती. त्यावेळी ज्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जात होत्या त्याच प्रकारे आताही शिक्षा देण्यास सुरूवात झाली आहे.