मांडवगण फराटा -बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याबद्दल मांडवगण फराटा येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघनाथ आबासाहेब गवळी (वय 33, रा. जुना मळा, मांडवगण फराटा) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून सोन्या बाळासाहेब थोरात, गोरख देवराम फराटे, तात्यासाहेब देवराम फराटे, देवराम मारुती फराटे, सारिका गोरख फराटे, रूपाली तात्यासाहेब फराटे (सर्व रा. मांडवगण फराटा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
23 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघनाथ गवळी हे घरी आईसह असताना वरील सहाही जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून गवळी यांच्या घरात शिरत चाकू, गज, विळा या हत्याराने त्यांच्यासह आईला मारहाण करून धमकी दिली.