बारामती ( प्रतिनिधी) – तालुक्यातील मुंबई घाटकोपर येथून लोन लोणी भापकर येथे आलेल्या 70 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोना संक्रमितांची संख्या 15 झाली आहे.
कोरोना संक्रमित महिला घाटकोपर मुंबई येथुन लोणी भापकर येथे दि(19)रोजी आली असून श्वसनाचा त्रास होत सदर महिलेची कोविड 19 चाचणी घेतली होती. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले . लोणी भापकर महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे. तरी सर्व लोणी भापकर ता बारामती येथील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये.
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे