कोल्हेवाडीतील नागरिकांनी शेकडो निवेदन देऊनही दुर्लक्ष; अखेर दिले आव्हान
खडकवासला – खडकवासला गावामधील शिव रस्ता पूर्णपणे उखडला आहे. साहेब…, या रस्त्यावरून तुम्ही चालून दाखवा, असे खुले आव्हान नागरिकांनी दिले असून रस्ता रूंदीकरण व दुरूस्तीची मागणी महापालिकेच्या पथ विभागाकडे केली आहे. पालिका बांधकाम विभागकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
या रस्त्यासंदर्भात या महिन्यांत अनेक निवेदने पालिकेला देण्यात आली आहेत. किरकटवाडी व कोल्हेवाडी-खडकवासला शिव रस्ता रूंदीकरण व सुधरणा या संदर्भात किरकटवाडीचे सरपंच गोकुळ कंरजावणे यांनी मुख्य अभियंता पद विभाग महानगर पालिका यांना निवेदन दिले आहे. खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांनीही निवेदन दिले आहे.
कोल्हेवाडी (खडकवासला) किरकटवाडी दरम्यानच्या या रस्यावर अवलंबुन असलेल्या दहा ते बारा हजार नागरिकांना जाण्यासाठी-येण्यासाठी मोठा त्रास सहान करावा लागत आहे. या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलने निवेदन देऊन झाली आहेत. परंतु, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता “साहेबांना’ या रस्त्यावरून चालून दाखविण्याचे आव्हानच नागरिकांनी दिले आहे.
यापुर्वी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी पुणे, नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. आमदार भीमराव तापकीर यांच्या माध्यमातून देखील या रस्त्याच्या संदर्भात पाठ करण्यात आला होता. या रस्त्यासंदर्भात तहसिलदार हवेली महसूल विभागातर्फ तरतुद चालू होती. अनेकदा प्रशासकीय विभागाने चालढकल केली आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण रेगाळले आहे.