शिक्रापूर – वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आतापर्यंत अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले आहेत. माहेर संस्थेमध्ये नुकताच 188 वा विवाह सोहळा पार पडला. अनाथ नेहाला आयुष्यभराचा जोडीदार मिळाला आहे.
वढु बुद्रुक येथील माहेर संस्थेमध्ये काही दिवसांपूर्वी अपघातातून बचावलेली तसेच कोणी पालक नसलेली नेहा पोलिसांच्या माध्यमातून दाखल झाली होती. माहेर संस्थेतून मिळालेल्या आश्रय व शिकवणीमुळे नेहा मोठी झाली. नुकताच तिचा विवाह सांगली येथील उद्योजक श्रीकांत शेंडे यांचे चिरंजीव सुबोध यांच्याशी ठरला. तर मधुसूदन गुरुजी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, माहेर संस्थेचे व्यवस्थापक विश्वस्त योगेश भोर, सहसंचालक रमेश दुतोंडे, मिनी एम. जे, माया शेळके, तुषार जोशी, रमेश चौधरी, विक्रम भुजबळ आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते माया शेळके, अनिता भालेराव, अतुल शेळके, विष्णू सूर्यवंशी, विक्रम भुजबळ, अनिता दुतोंडे, नीता सुर्यवंशी, वसंतराव यादव, विष्णू सूर्यवंशी, अमोल त्रिभुवन उपस्थित होते.