पिंपरी – राहुल गांधीनी तातडीने कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, असा आग्रह धरण्यासाठी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी “महास्वाक्षरी अभियान’ची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड मधील कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष अशोक मोरे, अनिकेत कोठावळे, अशोक मंगल, आयुष मंगल, उमेश काळे, नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, सौरभ शिंदे यांनी अभियानाची माहिती पत्रकाद्वारे दिली.
कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सर्व स्वाक्षऱ्या सादर केल्या जातील, असे अशोक मोरे यांनी सांगितले.