देशभरातील सुमारे ६ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत वाय-फाय आधारित इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जाळे भक्कम करणे आणि पीएम वाणी समर्थित कम्युनिटी वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी सहयोगातून ब्रॉडबँड सेवांकरिता रेलटेलने दूरसंचार विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, दूरसंचार विभागाने हा प्रस्ताव सुरु करण्याच्या अवधीनुसार पुढील वायफाय सुविधांची व्याप्ती वाढविण्यात येतील.