आढळराव पाटील : सहकारी पतसंस्थेच्या दैनंदिनी, टेबल बुक, दिनदर्शिकाचे प्रकाशन
मंचर – केवळ नफा कमावणे हाच उद्देश न ठेवता, सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ पतसंस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. पतसंस्थेने अत्यल्प व्याजदरात गरजू व होतकरू तरुणांना वित्त पुरवठा केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दैनंदिनी, टेबल बुक, दिनदर्शिकाचे प्रकाशन आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी येथे झाले, यावेळी ते बोलत होते. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह 17 शाखा आहेत. संस्थेचे सर्व व्यवहार ऑनलान असून पतसंस्थेकडे आज अखेर 412 कोटी रुपयांच्या ठेवी अाहेत, तसेच 300 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे आणि 160 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी दिली.
यावेळी पतसंस्थेच्या संचालिका कल्पना आढळराव पाटील, संचालक योगेश बानखेले, रामशेठ तोडकर, अशोक गव्हाणे, शोभा आवटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, लहुजी वस्तादचे उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू, शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख संतोष डोके, शिवसेना आंबेगाव तालुका समन्वयक शशिकांत बाणखेले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, विभागीय अधिकारी संतोष पाचपुते, वसुली अधिकारी श्याम गावडे, शाखाधिकारी अजित गवळी, शशिकांत निसाळ, सरपंच संगीता शेवाळे, उपसरपंच अंकुश लांडे, खंडेरावआढळराव पाटील, तानाजी शेवाळे, राजू शेवाळे, अंकुश शेवाळे, जालिंदर शेवाळे, नारायण लांडे यांसह सभासद आणिग्रामस्थ उपस्थित होते. संचालक योगेश बाणखेले यांनी आभार मानले.