कोरेगाव – भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कोरेगाव येथील रवींद्र रामचंद्र बोतालजी यांची निवड करण्यात आली आहे. आमदार महेश शिंदे यांचे ते कट्टर समर्थक आणि पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर यांच्या हस्ते बोतालजी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित भिसे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनुसूचित जाती मोर्चाचा विस्तार करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी परिश्रम घेईन, अशी ग्वाही बोतालजी यांनी दिली.
आमदार महेश शिंदे, डॉ. सौ. प्रिया शिंदे, डॉ. सौ. अरुणा बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष आणि कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, कोरेगाव विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बोतालजी यांचे अभिनंदन केले.