कात्रज – दत्त जयंतीनिमित्त कात्रज येथील यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था, कात्रज इंडस्ट्रियल असोसिएशन, दत्त सेवेकरी मंडळ कात्रज ग्रुप, मानवता प्रतिष्ठान व साईनाथ मित्रमंडळ यांच्या वतीने कात्रज ते नारायणपूर दुचाकी दर्शन रॅली उत्साहात पार पडली. यावेळी यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अनावरण यावेळी उपस्थित त्यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांची उपस्थिती यावेळी विशेष मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, माजी नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, संगीता ठोसर, वर्षा तापकीर, यंत्र निर्माणचे संस्थापक विकासनाना फाटे, संचालिका सारिका फाटे, साधना पारेख, दीपक गुजर, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, अरुण राजवाडे, अड. संभाजी थोरवे, महेश कदम, तुषार कदम, विलास मांगडे, गणेश काळे,स्वराज बाबर यांच्या उपस्थितीत महाआरती करून रथाचे प्रस्थान नारायणपूरकडे झाले.
यावेळी माधुकरी स्वरूपात अंदाजे १४००० किलो तांदूळ नारायणपला पाठविण्यात आले. रॅलीमध्ये ७०० दुचाकी गाड्यांसह दत्त भक्तांनी सहभाग घेतला होता तसेच १५० महिला होत्या प.पु.सद्गुरू आण्णा महाराजांच्या हस्ते तीन लकी ड्रॉ विजेत्यांना स्प्लेंडर, अॅक्टिव्हा व लपटॉप देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन यंत्रनिर्माणचे पदाधिकारी पोपटराव सुके, विकास फाटे, संतोष पारेख, मनोज राठी, महेश महांगरे, दीपक जाधव, देविदास जाधव, दिनकर सरपाले यांनी केले होते.