shreyas talpade । अनेक बॉलीवूड चित्रपटांच्या फ्रेंचायझीच्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. या यादीत ‘गोलमाल 5’ चित्रपटाचेही नाव आहे. ‘गोलमाल’ फ्रँचायझी सुपरहिट आहे. ‘गोलमाल 5’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. पुन्हा एकदा गोलमलचे कलाकार लोकांना हसवताना दिसणार आहे.
2020 मध्ये रोहित शेट्टीने सांगितले होते की,’तो ‘गोलमाल 5’ वर काम करत आहे. पण याच दरम्यान चित्रपटाशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने नुकताच एका मुलाखतीत हा चित्रपट कधी येऊ शकतो हे सांगितले. श्रेयसने सांगितले की, ‘गोलमाल 5′ चे शूटिंग पुढील वर्षी सुरू केले जाऊ शकते आणि 2025 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर तो रिलीज होऊ शकतो.’
श्रेयसच्या म्हणण्यानुसार, ‘गोलमाल 5’ ची घोषणा करोना काळात झाली. या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. लाकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे. अशात प्रेक्षकही ‘गोलमाल 5’ची वाट पाहत आहेत.’
श्रेयसने कॉमेडी चित्रपटांबाबत आपले मत मांडले. कॉमेडीत बदल झाल्याचे तो सांगतो. गोलमाल किंवा हाऊसफुल सारख्या चित्रपटांपूर्वी 2005 मध्ये अनेक मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाले होते.
श्रेयस तळपदेच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर, तो लवकरच अनोखी गाथ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो वेलकम टू द जंगल या मल्टीस्टारर चित्रपटातही दिसणार आहे.