Aamir Khan । लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर सुपरस्टार आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली. आमिर यानंतर निर्माता म्हणून जास्त सक्रिय दिसून आला. आता आमिरने जाहीर केले आहे की तो अभिनयातील ब्रेकमधून परत येणार आहे.
आमिरने सांगितले ,’एका चित्रपटातील मुख्य भूमिकेशिवाय तो अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही करणार आहे. त्याला या पात्रांमध्ये पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहायचे आहे. मुख्य अभिनेता म्हणून माझ्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग आता सुरू झाले आहे. त्याचे नाव ‘सीतारे जमीन पर’ आहे, हा चित्रपट वर्षाच्या शेवटी ख्रिसमसपर्यंत प्रदर्शित होणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे, मला त्याची कथा खूप आवडली आहे, त्यामुळे आम्ही सध्या त्याचे शूटिंग करत आहोत.’ असाही तो एका मुलाखतीत म्हणाला आहे.
त्याने पुढे सांगितले की तो एक-दोन छोट्या भूमिका करत आहे. त्याने ‘अति सुंदर’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका साकारली आहे.
आमिरने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, त्याच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेला ‘सीतारे जमीन पर’ त्याच्याच सुपरहिट चित्रपट ‘तारे जमीन पर’शी संबंधित आहे. दोन्ही चित्रपटांची कथा एकाच विषयाकडे वेगळ्या पद्धतीने पाहते, असे आमिर म्हणाला होता. ‘सीतारे जमीन पर’ हा एक मनोरंजक आणि विनोदी चित्रपट असेल.