Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती १४ डिसेंबर रोजी समोर आली. मात्र आता तो धोक्याबाहेर आहे असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ ( Welcome to jungle ) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले आणि तो लगेच जमिनीवर कोसळला.
त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस बाबतचे वृत्त समोर येताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरु केली.
अशात, आता बॉबी देओलने आपला मित्र श्रेयसच्या प्रकृतीबाबत सांगितले होते, जेव्हा त्याच्यासोबत ही घटना घडली तेव्हा श्रेयसच्या हृदयाचे ठोके दहामिनिटांसाठी थांबले होते. सगळ्यांनाच काळजी वाटत होती.
एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉबीने दीप्तीशी बोलल्याचे सांगितले होते. तिनेच ही माहिती दिली. बॉबीच्या म्हणण्यानुसार श्रेयसची पत्नी खूप अस्वस्थ झाली होती. आपल्या नवऱ्याचा एक प्रकारे पुनर्जन्म झाल्याचे ती सांगत होती.’ असं यावेळी बॉबी म्हणाला.
दरम्यान, जेव्हा अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. या घटनेनंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आणि आता तो बरा झाला आहे. एक-दोन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.