अंबाडी- श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या प्रेरणेने, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांच्या संकल्पनेतून अंबाडी नाका श्रमजीवी कार्यालयात “माणुसकीची थाळी” हा उपक्रम सुरु झाला आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या,रस्त्याने चालणाऱ्या ,रेशनकार्ड नसलेल्या भुकेल्या बांधवांना दिलासा देण्यासाठी श्रमजीवीने हा उपक्रम सुरू केला असून आज गणेशपुरीचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या “माणुसकीच्या थाळीचे” शुभारंभ करण्यात आला, पहिल्याच दिवशी 200 गरजूंनी या थाळीचा लाभ घेतला, 150 ते 200 माणसांना दुपारी आणि संध्याकाळी हे तयार जेवण देऊन इथेच बसून जेवण करण्याची पूर्ण व्यवस्था याठिकाणी केली आहे. पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी आज या ठिकाणी भेट देत श्रमजीवी तरुणांचे कौतुक केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉक डाऊन नंतर अनेक गरीब कुटुंबावर संकट कोसळले, विशेषतः रोजंदारी कामगार आणि स्थलांतर होउन आलेलं वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर यांची बिकट अस्वस्था होती. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक पंडित स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम भागात मदतकार्य करताना सर्वांनी पाहिले, ठाणे पालघर रायडग नाशिक या भागात देखील कार्यकर्त्यांनी शक्य ते मदत कार्य केले, इकडे भिवंडी तालुक्यातील श्रमजीवी संघटना युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी या भिवंडी- वाडा, शिरसाड-अंबाडी आणि दाभाड-अंबाडी मार्गावरून चालत येणाऱ्या शेकडो कामगारांना भोजन, पाणी,वाहन आणि सुरक्षित स्थळी त्यांची राहण्याची सगळी काळजी घेतली आहे.
सोबत आतापर्यंत विविध दात्यांच्या मदतीने सामान गोळा करून तब्बल 1000 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तू देऊन दिलासा दिला आहे, आता 22 एप्रिल (आज) पासून 150 ते 200 लोकांचे तयार जेवण मोफत देण्यासाठी “माणुसकीची थाळी” सुरू केल्याने अंबाडी नाक्यावरील मजूर कष्टकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.
या संपूर्ण मोहिमेत श्रमजीवी संघटनेचवे प्रमोद पवार यांच्यासोबत, नारायण जोशी, जयेंद्र गावित, जेयश पाटील, नवनाथ भोये, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश जाधव,श्रमजीवी टॅक्सी युनियन चे भूषण जाधव,महेश ठाकरे,मुकेश जोशी, जनार्दन ठाकरे,देवराज आणि दीपा लाटे, मुकेश पाटील, निलेश चव्हाण, अमोल सवर,नईम शेख, सतीश जाधव, संतोष पाटील, संजय ठाकरे ,दिनेश जाधव, भूषण घोडविंदे,दीपक मानकर ,सुभाष राठोड, रोहित पाटील इत्यादींनी मोलाची साथ दिली. अनेक दात्यांनी पुढे येत हातभार लावणाऱ्ऱ्यांचे प्रमोद पवार यांनी श्रमजीवीच्या वतीने आभार व्यक्त केले.