वाई (प्रतिनिधी) : येथील सिद्धनाथवाडीजवळ कालव्यात पोहल्याप्रकरणी दोन युवकांविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय विनोद प्रसाद ठाकूर (वय २४), करमहुसेन अहमदहुसेन गद्दी (वय २३, दोघे रा. सिद्धनाथवाडी वाई) यांनी गरुवारी दि. २३ रोजी दुपारी वाई ते पाचगणी रस्त्यालगतच्या सिद्धनाथवाडीजवळ धोम डावा कालव्यात सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता सुरक्षित अंतर न पाळता कालव्याच्या पाण्यामध्ये एकत्रित पोहत असताना मिळून आले. त्यांनी व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल व संसर्ग पसरविण्याची घातक कृती करून करोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती निवारण कायद्यान्वये जारी केलेल्या आदेशाचा भंग केला. म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल देशमुख वाई पोलीस पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.