दुकानदाराची दिशाभूल करत रक्‍कम लुटली

भिगवण – तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील एका दुकानदाराला सुट्टे पैसे मागण्याचा बहाणा करुन व दुकानातील आटा चक्‍कीच्या मशीनबाबत माहीती विचारत दिशाभूल करून दुकानाच्या गल्ल्यातील 80 हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. 23) रोजी घडली. याबाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुमार सहजानंद भारती (रा. कावळवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. कुमार भारती यांचे तक्रारवाडी गावामध्ये बालाजी इंटरप्रायजेस इलेक्‍ट्रीक दुकान आहे. यामध्ये सोमवारी (दि. 23) एक अनोळखी व्यक्‍तीने सुट्टे पैसे मागण्याचा बहाणा करून व दुकानातील आटा चक्‍कीच्या मशीनबाबत माहिती विचारून फिर्यादीची नजर चुकवून गल्ल्यातील रोकड पळविली.

Leave A Reply

Your email address will not be published.