नवी दिल्ली : पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सध्या दुचाकस्वारांचा शोध घेण्यात येत आहे.
पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकत हा हल्ला केला आहे. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यामुळे पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
Punjab | A grenade blast took place near Triveni Gate of an Army camp in Pathankot. Further investigation is underway. CCTVs footage will be probed: SSP Pathankot, Surendra Lamba pic.twitter.com/NsVSQxz0eF
— ANI (@ANI) November 22, 2021
पठाणकोटच्या एसएसपी सुरेंद्र लांबा यांनी सांगितलं की, “प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे की, आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. पुढील तपास सुरु आहे. सांगितले जात आहे की, गेटसमोरून एक दुचाकी गेली, त्याच वेळी हल्ला झाला. याबाबत सखोल तपास सुरु आहे. आम्हाला चांगला फोटो मिळण्याची आशा आहे.”
दरम्यान, पठाणकोट भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वायुसेनेचे कॅम्प, लष्कराचा दारूगोळ्याचा डेपो आणि लष्कराच्या दोन ब्रिगेड आहेत. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोटमधील वायुसेनेच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पठाणकोट वायुसेनेचे कॅम्प त्यावेळी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. या हल्ल्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर लष्कराचे 8 जवान शहीद झाले होते.