मुंबई – यंदाचा विकेण्ड प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठा “धमाका’ होणार आहे. एकीकडे नेटफ्लिक्सवर कार्तिक आर्यनचा
“धमाका’, तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता रवि दुबेचा एक कार्यक्रम एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ऍमेझॉन प्राइमवर “द व्हील्स ऑफ टाइम’ आहे.
छोट्या पडद्यावरील रवि दुबेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचा “मस्ती थडा’ हा कार्यक्रम एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. देशभरात अनेक गुन्हे केलेल्या चोराभोवती या कार्यक्रमाचे कथानक आहे.
तसेच कार्तिक आर्यनचा “धमाका’ सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. हा कोरियन चित्रपट “द टेरर लाइव’चा हिंदी रिमेक असणार आहे. कार्तिक यात अर्जुन पाठक या नावाजलेल्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
हा चित्रपट भारतीय पत्रकारितेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी याची निर्मिती केली आहे.