मुंबई – “चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आपल्या अभिनयाने श्रेया प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे.
View this post on Instagram
श्रेया सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. श्रेयाने नुकताच तिचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
View this post on Instagram
या फोटोमधील श्रेयाच्या गळ्यातील चेनने अनेकांचे लक्ष वेधले. श्रेयाने तिचे फोटो शेअर करून त्याला “मूड’ असे कॅप्शन दिले. या फोटोमध्ये श्रेयाच्या गळ्यात एक चेन दिसत आहे. या चेनचे
View this post on Instagram
लॉकेट हे बिग बॉसच्या लोगोसारखे आहे. त्यामुळे श्रेया लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. श्रेयाच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
सध्या बिग बॉस-3 ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मराठी बिग बॉसचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर हे करतात. तसेच दर आठवड्याला एक स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर होतो. आता श्रेया या शोमध्ये एंट्री करणार का?, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.