नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच आता देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात २१ दिवस लॉकडाउन असून, या संकटकाळात केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. जगभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या आजारामुळे जगभरात २१ हजार मृत्यू झाले आहेत.तर तिकडे चीननंतर आता अमेरिका कोरोनाचे केंद्रबिंदू बनले असून इथला कोरोना बाधितांचा आकडा हा ८३ हजाराच्या पुढे गेला आहे.