नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात बाल गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अश्यातच एक प्रकार युरोपियन देश सर्बिया मध्ये घडला आहे. सर्बियातील बेलग्रेड येथील एका शाळेमध्ये सातवीतल्या मुलाने अंदाधुंद गोळीबार केला असून यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 8 विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. शिवाय अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सर्बियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेबाबतची माहिती दिली आहे. मंत्रालयाने एका निवेदनामध्ये सांगितले आहे की, ‘गोळीबार झाल्याचे माहिती होताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे’.
दरम्यान, याप्रकरणी एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितावर त्याच्या वडिलांची बंदूक वापरल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.