Breaking News – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले. आपण राजीनामा घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या, लोक भावनेचा आदर करत आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी, नवे नेतृत्व घडवण्याच्या मताशी आपण ठाम असून आपण त्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य जनता तसेच अन्य राजकीय पक्षांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी गळ घातल्याचे सांगितले.
अजित पवारांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह…
दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याचे समर्थन करणारे अजित पवार, राजीनामा मागे घेण्याच्या पत्रकारपरिषदेतील अनुपस्थिती राहिले. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी, राजीनामा मागे घेण्याचा निर्णय सर्वानुमते झाला असल्याचे सांगितले.